केंद्र सरकारची योजना, शेतकऱ्यांना उद्योगासाठी मिळणार 10 लाख रुपये, इथे करा ऑनलाइन अर्ज | Central Government New Scheme


केंद्र सरकारची योजना, शेतकऱ्यांना उद्योगासाठी मिळणार 10 लाख रुपये, इथे करा ऑनलाइन अर्ज | Central Government New Scheme


शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करताना इतर माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता यावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्नशील असते. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तळागाळातील विविध योजना राबविण्यात येतात. या नव्याने सुरू झालेल्या योजनांपैकी एक PMFME योजना आहे जी मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस योजनांचे पंतप्रधान औपचारिकीकरण म्हणून ओळखली जाते. केंद्र सरकारकडून या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

जिल्ह्यामध्ये ज्या पिकाचे जास्त उत्पादन शेतकरी घेतात त्या उत्पादन संबधित उद्योग उभारणीसाठी लाभार्थ्यांना जास्तीत जास्त १० लाख किंवा एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून प्रस्ताव सादर करावे लागणार आहे.

 

👉 हे ही वाचा :  सर्व योजनांची माहिती मिळणार एकाच ठिकाणी ईथे बघा सर्व योजना | My Scheme Portal👈

 

या योजने अंतर्गत १८ वर्षावरील वैयक्तिक मालकी / भागीदारी, शेतकरी उत्पादक गट संस्था/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाखपर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन / शासकीय संस्था भाग धेवु शकतात. सदर घटकासाठी ३.०० कोटी कमाल मर्यादेसह पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के क्रेडीट लिंक कॅपिटल सबसिडी दिली आहे.

फळ पिकांसाठी मिळणार कर्ज 

या योजनेतील काही जाचक अटी रद्द करून आता सरकारने शेतकऱ्यांना कोणतेही पीक किंवा फळांवर आधारित उद्योग सुरू करण्याची संधी दिली आहे.

 

👉 या योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लीक करा 👈

Previous Post Next Post