शेतकऱ्यांसाठी खुशखबर नियमित कर्ज

 karj mafi news

शेतकऱ्यांसाठी खुशखबर नियमित कर्ज-फेड शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान कोणाला मिळणार लाभ?



महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी एक खुशखबर आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारने ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना) या कर्जमाफीची घोषणा केली होती. आज अखेर या योजनेसाठी ७०० कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्याच्या तिजोरीवर पडणार ४ हजार ७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार कर्जमाफीसाठी. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपया पर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून ७०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळं ४ हजार ७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. याआधी २ हजार ९०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर आता ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

१४ लाख शेतकऱ्यांना लाभ
राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय जुलैमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि ६ हजार कोटी निधी लागेल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १३.८५ लाख शेतकऱ्यांच्या १४.५७ लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे ५ हजार ७२२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ २०१९ मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

कोणाला मिळणार लाभ?
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० हा कालावधी विचारात घेतला आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे.

कुणाला किती अनुदान? ज्या शेतकऱ्याने ५० हजार किंवा त्याच्या वर १ लाख किंवा त्याही पेक्षा ज्यास्त कर्ज घेतले आहे व गेल्या तीन वर्षांत त्याने पीक कर्ज ठरवून दिलेल्या कालावधीत भरले आहे. त्याला ५० हजार रुपये दिले जातील. ज्या शेतकऱ्यांचे पन्नास हजारांच्या आत कर्ज आहे त्यांना कर्ज इतकी रक्कम दिली जाणार आहे.
Previous Post Next Post