
शेळी मेंढी गट वाटप योजना ऑलाइन अर्ज झाले सुरु | Sheli Mendhi Gat Vatap Yojana
Sheli Mendhi Gat Vatap Yojana (नाविन्यपुर्ण
योजना) –
अंशत: ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी १० शेळया/मेंढया +१ बोकड/नर मेंढा या
प्रमाणे लाभार्थींना शेळी /मेंढी गट वाटप करणे Sheli Mendhi Gat Vatap Yojana
शासन निर्णय शासन निर्णय क्रमांक : पविआ-०११/प्र.क्र.७४/पदुम-३
योजनेचा प्रकार-Type of scheme :
वैयक्तिक लाभाची योजना
योजनेचा उद्देश-Purpose of the
Scheme :
·
राज्यातील ग्रामीण भागात
स्वयंरोजगारास चालना देण्यासाठी
·
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे
त्याचे नाव :
·
सर्वसाधारण/अनुसूचित जाती /आदिवासी
जमाती
हे ही वाचा : सोलर पंप 95% अनुदान योजना पण कोणत्या
शेतकऱ्यांना किती Hp
चा
पंप मिळणार 3hp
ते
7.5 hp जाणून घ्या | Saur Krushi Pump Scheme
योजनेच्या प्रमुख अटी-Key terms of the scheme
1. या
योजनेखाली शेळी/मेंढी गटाची (उस्मानाबादी /संगमनेरी /माडग्याळ / अन्य स्थानिक
प्रजातीच्या) खरेदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास
महामंडळाच्या आणि कृषि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरून अथवा शेळया-मेंढयांच्या
मान्यताप्राप्त बाजारातून करण्यात यावी, आणि
शासनाने निश्चित केलेल्या आराखडयाप्रमाणे ईकानॉमी टाईप वाडा उभारणे आवश्यक आहे. ‘Sheli Mendhi Gat Vatap Yojana’
2. सदर
योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या शेळयांचा गट योग्य तऱ्हेने पालनपोषण करून करून
स्वत: कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग करणे आवश्यक आहे.
3. योजनेअंतर्गत
– प्राप्त झालेल्या गटातील शेळयांचा गट पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना
पाठपुरावा/ योजना मूल्यांकनासाठी आवश्यक त्या वेळेस उपलब्ध करून देणेचे आहे.
4.एकुण
निवड करावयाच्या लाभधारकांमध्ये 3 टक्के
विकलांग व 30 टक्के
महिला लाभार्थीचा समावेश राहील.
5.योजनेअंतर्गत
प्राप्त झालेले शेळयांचा गट आजारी पडल्यास अथवा पशुवैद्यकाची गरज पडल्यास नजिकच्या
पशुवैद्यकिय दवाखान्यात घेऊन जाणे, व
त्यांच्या सल्यानूसार उपचार करून घेणेची तबाबदारी लाभधारकाची आहे. “Sheli Mendhi Gat
Vatap Yojana”
6. योजनेअंतर्गत
प्राप्त झालेले शेळयांचा गट 3 वर्षे
योग्य रितीने सांभाळणे व त्यापासून व्यवसाय करणे बंधनकारक आहे. या दरम्यान विमा
काढलेल्या जनावरांचा विम्याचा बिल्ला कानातून पडल्यास त्याबाबत त्वरीत बँक/ विमा
कंपनी/पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांना कळविणे बंधनकारक आहे.
7. योजनेअंतर्गत
प्राप्त झालेले शेळयांचा गट मृत पावल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यास सूचित
करून मृत जनांवराचे शवविच्छेदन करून घेईल व मिळणाऱ्या विमा रकमेतून शेळी खरेदी
करणे बंधनकारक राहील.
8. योजनेअंतर्गत
– प्राप्त झालेल्या शेळयांचा गटाचे साथीच्या रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी
वेळोवेळी लसीकरण करून घेण्याची जबाबदारी राहील. Sheli Mendhi Gat Vatap Yojana
9. अर्जदार
पती/पत्नीपैकी कोणीही शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा
सेवानिवृत्त नाही, अथवा
पदाधिकारी नसावेत.
10.अर्जदारास
शेळी गट वाटप योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला नसावा.
11. या
योजनेमध्ये देण्यात आलेल्या शेळयांचा गट वनक्षेत्रात चराईसाठी सोडू नये आणि वन व
पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे :
·
1 फोटो
ओळखपत्राची सत्यप्रत
·
2 दारिद्र्ययरेषेखाली
असल्याचा दाखला
·
3 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8
·
4 प्रशिक्षण
घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
·
5 जातीच्या
दाखल्याची सत्यप्रत
·
6 बचत
गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
·
7 रोजगार-स्वयंरोजगार
कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाची सत्यप्रत.
·
8 अपत्य
दाखला (ग्रामपंचायत यांचा)
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
10शेळया/मेंढया
+1 बोकड/नर
मेंढा (उस्मानाबाद/ संगमनेरी जातीच्या) शेळी गट प्रकल्पाची किंमत- रु.87857/- आणि (स्थानिक जातीच्या) गट
प्रकल्पाची किंमत- रु.64886/-
सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 50 % अनुदान आणि अनुसूचित जाती /आदिवासी
जमाती साठी प्रकल्प किंमतीच्या 75
% अनुदान देय राहील. Sheli Mendhi Gat Vatap Yojana
अर्ज करण्याची पद्धत :
नजिकचा पशुवैद्यकिय दवाखाना व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समितीकडे अर्ज करावा लागेल.
अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
90 दिवस
संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
1.पशुधन
विकास अधिकारी (विस्तार),पंचायत
समिती
2.जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा
परिषद,
3.जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा